Amc Nagar

Amc Nagar

Share

500 वर्षांची परंपरा असलेल्या या अहिल्यानगरला सुंदर सुशोभित करण्यासाठी अहोरात्र झटणारी संस्था !

Photos from Amc Nagar's post 04/06/2026

"पावसाचे संकट दूर सारत, आरोग्यदायी आणि सुरक्षित शहराकडे महानगरपालिकेची वाटचाल!"

अहिल्यानगर शहरात बुधवार दिनांक ३ जून २०२६ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे पितळे कॉलनी, बोल्हेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पाण्याचा निचरा होत नसल्याने नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. तसेच साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता होती.

या परिस्थितीची तात्काळ दखल घेत अहिल्यानगर महानगरपालिकेच्या जेटिंग मशीनद्वारे साचलेल्या पाण्याचा उपसा करण्यात आला. पाण्याचा निचरा करून परिसरातील रस्ता पुन्हा नागरिकांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण, डासजन्य आजारांना प्रतिबंध आणि पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन सतत कार्यरत आहे.

Photos from Amc Nagar's post 04/06/2026

🟦🟩🟨🟥 पिंपळगाव माळवी तलाव परिसरात अवैध पाणी उपसा करणाऱ्या मोटारी जप्त करण्याची कारवाई सुरू 🟥🟨🟩🟦

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या मालकीच्या पिंपळगाव माळवी तलावातून विनापरवाना व अनधिकृतरित्या पाणी उपसा करणाऱ्यांविरुद्ध आज धडक कारवाई करण्यात आली. तलावातील पाण्याचा अवैध उपसा करण्यासाठी बसविण्यात आलेल्या मोटारी जप्त करण्याची कार्यवाही महापालिकेच्या संबंधित विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे.

महानगरपालिकेच्या मालकीच्या जलस्रोतांचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात येत असून, तलावातील पाण्याचा बेकायदेशीर वापर रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. विनापरवाना पाणी उपसा केल्यामुळे जलसाठ्यावर ताण येत असून भविष्यात नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी तलाव परिसराची पाहणी करून अवैधरीत्या बसविण्यात आलेल्या मोटारी व साहित्य जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली. यापुढेही महापालिकेच्या मालकीच्या जलस्रोतांवर अतिक्रमण अथवा अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्यांविरुद्ध अशाच प्रकारची कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

जलसंपत्तीचे रक्षण, भविष्यातील पाणी सुरक्षित करण्याचे अभियान!

04/06/2026

🌧️ जोरदार पावसामुळे जुने कोर्ट परिसरात साचलेले पाणी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी रात्रीच तातडीने निचरा करून परिस्थिती नियंत्रणात आणली. 👏

02/06/2026

♻️ सवयीत छोटासा बदल, पर्यावरणासाठी मोठं योगदान!
वस्तूंचा पुनर्वापर करा, कचरा कमी करा आणि हरित भविष्यासाठी हातभार लावा. 🌱




02/06/2026

आपली छोटी कृती घडवेल मोठा बदल!
गरज नसेल तेव्हा लाईट्स आणि फॅन्सचे स्विचेस बंद करूया आणि विजेचा अनावश्यक वापर टाळून, पर्यावरणाचं रक्षण करूया!

02/06/2026

✅ प्रगणकाची ओळख पटवा, माहिती देण्यापूर्वी खात्री करा आणि फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करा. #जनगणना२०२७

01/06/2026

👉 “‘अ’ म्हणजे अहिल्यानगरचा अभिमान, अखंड कार्याचा ध्यास आणि अचूक जनगणनेचा विश्वास! चला, जनगणना 2027 यशस्वी करण्यासाठी एकत्र येऊया.” 🙏📋✨

#जनगणना2027 #अहिल्यानगरमहानगरपालिका

Photos from Amc Nagar's post 01/06/2026

"शहराचे सौंदर्य जपूया... अनधिकृत फ्लेक्समुक्त अहिल्यानगर घडवूया!"

अहिल्यानगर शहराचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी, सार्वजनिक ठिकाणांचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अहिल्यानगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत दि. १ जून २०२६ रोजी विशेष अनधिकृत फ्लेक्स जप्ती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणी परवानगीशिवाय उभारण्यात आलेले फ्लेक्स, होर्डिंग्ज आणि जाहिरात फलक हटवून जप्त करण्यात आले.

प्रभाग समिती क्र. ३ अंतर्गत प्रोफेसर कॉलनी, गुलमोहर रोड, सुरभी हॉस्पिटल परिसर, वसंत टेकडी, नामदेव चौक, श्रीराम चौक, पाईपलाईन रोड, भिस्तबाग चौक, सोना नगर चौक, गुलमोहर कॉर्नर, समर्थ शाळा ते तारकपूर रोड आणि सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्यात आली. या प्रभागात ३ मोठे फ्लेक्स आणि १ मोठे होर्डिंग हटविण्यात आले. तसेच प्रभाग समिती क्र. १ (सावेडी) अंतर्गत ९ मोठे फ्लेक्स आणि ३२ लहान बोर्ड, प्रभाग समिती क्र. २ मध्ये ११ मोठे फ्लेक्स आणि लाईटच्या खांबांवरील ४६ लहान बोर्ड, तर प्रभाग समिती क्र. ४ मध्ये ६ मोठे फ्लेक्स आणि लाईटच्या खांबांवरील ३९ बोर्ड हटवून जप्त करण्यात आले.

या विशेष मोहिमेत महानगरपालिकेने एकूण २९ मोठे फ्लेक्स, ५ मोठे होर्डिंग फ्लेक्स आणि १३९ लाईटच्या खांबांवरील व इतर लहान जाहिरात फलक हटवून जप्त केले. अनधिकृत फ्लेक्स आणि जाहिरात फलकांमुळे शहराचे सौंदर्य बाधित होते, वाहतूक चिन्हे व महत्त्वाच्या सूचना झाकल्या जातात, तसेच वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघातांचा धोका निर्माण होतो. याशिवाय पावसाळा आणि वादळी वाऱ्याच्या काळात हे फ्लेक्स कोसळून नागरिकांच्या जीवित व मालमत्तेसाठी गंभीर धोका निर्माण करू शकतात.

शहर अधिक स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि नियोजनबद्ध ठेवण्याच्या उद्देशाने अहिल्यानगर महानगरपालिका अशा अनधिकृत जाहिरातींविरोधातील कारवाई सातत्याने सुरू ठेवणार असून नागरिकांनी कोणतेही फ्लेक्स, बॅनर किंवा जाहिरात फलक उभारण्यापूर्वी आवश्यक परवानगी घेऊन महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

01/06/2026

📢 नागरिकांनो कृपया लक्ष द्या!

शहर पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे काही भागांतील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. संबंधित भागांमध्ये नियोजित वेळेनुसार पाणी पुरवठा पुढील दिवशी करण्यात येईल.

💧 पाण्याचा वापर जपून व काटकसरीने करा.
🤝 आपल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

Want your business to be the top-listed Government Service in Ahmednagar?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address

Ahilyanagar Municipal Corporation Chhatrapati Sambhaji Nagar Road
Ahmednagar
414001