Vidarbha Rajya Andolan Samiti

Vidarbha Rajya Andolan Samiti

Share

विदर्भ राज्य आंदोलन समिती

11/06/2026

विदर्भ फक्त भूभाग नाही… तो स्वाभिमान आहे! 🚩
संसाधने विदर्भाची, मेहनत विदर्भाची,
मग विकासाचा हक्कही विदर्भाचाच!
युवकांनो आता शांत बसायचं नाही,
प्रश्न विचारायचे, आवाज उठवायचा आणि परिवर्तन घडवायचं.
एकच ध्येय — न्याय्य, सक्षम आणि विकसित विदर्भ!
🔥 उठा विदर्भवासी, जागा हो!

॥ जय विदर्भ ॥

:::

10/06/2026
09/06/2026

वीज विदर्भाची... कोळसा विदर्भाचा... नैसर्गिक साधनसंपत्ती विदर्भाची...!

मग प्रश्न असा आहे की, या सर्व संपत्तीचा खरा फायदा कोण घेतोय...?

विदर्भातील कोळसा, वीज निर्मिती प्रकल्प, खनिज संपत्ती, जंगलसंपदा, शेती आणि नैसर्गिक संसाधनांच्या बळावर राज्याचा विकास होत आहे. विदर्भ मोठ्या प्रमाणात महसूल उत्पन्न देतो, पण विकासाच्या बाबतीत मात्र विदर्भ आजही मागेच का?

विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतो, युवक बेरोजगारीचा सामना करतो, उद्योगधंदे कमी आहेत, सिंचनाचा अनुशेष कायम आहे, रस्ते, आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा अपुऱ्या आहेत. दुसरीकडे विदर्भाच्या संसाधनांवर इतर भागांचा विकास होत असल्याची भावना जनमानसात अधिक तीव्र होत आहे.

🚩 विदर्भातील युवकांनो, आता तरी जागे व्हा!
🚩 ऊठ विदर्भवासी, जागा हो... स्वतंत्र विदर्भचा धागा हो!

तुझ्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठव.
तुझ्या हक्कांसाठी संघटित हो.
विदर्भाच्या स्वाभिमानासाठी पुढे ये.
स्वतंत्र विदर्भाच्या लढ्यात सहभागी हो.

आजचा संघर्ष हा केवळ प्रदेशाचा नाही, तर आपल्या भावी पिढ्यांच्या न्याय्य हक्कांचा संघर्ष आहे.

एकच ध्यास – स्वतंत्र विदर्भ राज्य! एकच आवाज – जय विदर्भ!

विदर्भ राज्य आंदोलन समिती
जय विदर्भ

िदर्भ
#स्वतंत्र_विदर्भ
#विदर्भ_राज्य
#विदर्भ_राज्य_आंदोलन_समिती






#विदर्भाचा_हक्क
#विदर्भासाठी_लढा
#विदर्भ_स्वाभिमान

09/06/2026

🌿 जल, जंगल, जमीन आणि स्वाभिमानासाठी लढणारे
आदिवासी क्रांतीचे महानायक
भगवान बिरसा मुंडा यांना विनम्र अभिवादन! 🙏

त्यांच्या बलिदान, संघर्ष आणि स्वराज्याच्या विचारातून प्रेरणा घेत
न्याय, हक्क आणि स्वतंत्र विदर्भाच्या लढ्याला नवी दिशा देऊया.

विदर्भ राज्य आंदोलन समिती
#भगवानबिरसामुंडा #विदर्भराज्य #जलजंगलजमीन

08/06/2026

महागाई, बेरोजगारी आणि वाढत्या गुन्हेगारीविरोधात विदर्भ राज्य आंदोलन समिती आक्रमक; तीव्र आंदोलनाचा इशारा

नागपूर : राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई, युवकांमधील वाढती बेरोजगारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांविरोधात विदर्भ राज्य आंदोलन समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत समितीने लवकरच व्यापक जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, जीवनावश्यक वस्तू, इंधन, गॅस आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किंमती सातत्याने वाढत असल्याने सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. दुसरीकडे, सुशिक्षित युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्याने बेरोजगारीचे संकट अधिक गडद होत आहे.

यासोबतच राज्यातील विविध भागांत वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्था राखण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची टीका समितीने केली. शासनाने तातडीने महागाई नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, बेरोजगार युवकांसाठी रोजगार निर्मितीचे धोरण राबवावे आणि गुन्हेगारीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी समितीने केली आहे.

या मागण्यांकडे शासनाने तात्काळ लक्ष न दिल्यास विदर्भभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा विदर्भ राज्य आंदोलन समितीने दिला आहे.

#विदर्भराज्यआंदोलनसमिती #महागाई #बेरोजगारी #गुन्हेगारी #विदर्भ #जनआंदोलन #शेतकरी #युवक #महाराष्ट्र

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे, तरीही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूं 08/06/2026

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे, तरीही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूं नेते आश्वासन देऊन पाठ दाखवणार असतील, तर पाठीवर दणका कसा द्यायचा हे आम्हाला ठाऊक नसल्याचे बच्चू कडू म्हणाले. सरकार ...

08/06/2026

विशाल राठोड यांची विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पूर्व विदर्भ सोशल मीडिया उपाध्यक्षपदी नियुक्ती

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या संघटनात्मक विस्ताराला बळकटी देण्याच्या उद्देशाने युवा कार्यकर्ते विशाल राठोड यांची पूर्व विदर्भ सोशल मीडिया उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून विदर्भ राज्याच्या जनआंदोलनाला अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविणे, संघटनेच्या भूमिका व उपक्रमांची माहिती व्यापक स्तरावर प्रसारित करणे तसेच युवकांना चळवळीशी जोडण्यासाठी विशाल राठोड कार्यरत राहतील, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

नियुक्तीनंतर विशाल राठोड यांनी संघटनेने त्यांच्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार मानत, स्वतंत्र विदर्भ राज्याच्या लढ्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिक बळकटी देण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

त्यांच्या नियुक्तीबद्दल विविध सामाजिक, राजकीय व युवक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

#विशालराठोड #विदर्भराज्यआंदोलनसमिती #पूर्वविदर्भ #सोशलमीडिया_उपाध्यक्ष #विदर्भराज्य

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address

Mumbai