05/06/2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई (एसआरए) मार्फत मुंबईतील विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये विशेष समस्या निराकरण शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांच्या विविध प्रशासकीय अडचणींवर तात्काळ कार्यवाही करून त्यांच्या समस्या त्यांच्या दारातच सोडविल्या जात आहेत. या उपक्रमाचा लाभ हजारो नागरिकांनी घेतला असून, प्राधिकरणाच्या कामकाजाविषयीचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
या लोकाभिमुख उपक्रमाचा सविस्तर अहवाल झोपुप्रा बृहन्मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. यावेळी आतापर्यंत आयोजित करण्यात आलेल्या शिबिरांच्या छायाचित्रांची पुस्तिकाही प्रकाशित करून मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करण्यात आली.
या प्रसंगी सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार आणि कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.
#जनकल्याण
#लोकाभिमुखशासन
#समस्यानिराकरणशिबिर
#मुंबईविकास
#सुशासन
#जनसेवा
#विकसितमहाराष्ट्र
#महाराष्ट्रशासन
#नागरिकहित
#प्रशासनआपल्यादारी
05/06/2026
कार्यकर्तृत्वाचा गौरव,
सेवाभावी नेतृत्वाचा सन्मान!
महाराष्ट्राच्या विकासात आणि जनहिताच्या कार्यात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते 'पुढारी महा आयकॉन २०२६' पुरस्कार प्रदान करण्यात आला. 'कर्तृत्वाचा अभिमान, महाराष्ट्राची शान' या ब्रीदवाक्याखाली आयोजित या सन्मान सोहळ्यास राज्याचे उद्योगमंत्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
04/06/2026
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात आणि राष्ट्राच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी 'पुढारी' माध्यम समूहाने 'महा आयकॉन २०२६' या नव्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमांतर्गत 'कर्तृत्वाचा अभिमान, महाराष्ट्राची शान' हे ब्रीदवाक्य असलेला पहिला सन्मान सोहळा परळ येथील आयटीसी ग्रैंड सेंट्रल हॉटेलमध्ये संपन्न झाला. यात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 'पुढारी महा आयकॉन २०२६' पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
#झोपडपट्टी #पुनर्वसन #प्राधिकरण #बृहन्मुंबई #महाराष्ट्रशासन
03/06/2026
आज झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई कार्यालयात झोपुप्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांनी भेट घेतली. यावेळी अंधेरी पश्चिम मतदारसंघातील विविध एसआरए प्रकल्पांशी संबंधित प्रश्न, प्रलंबित बाबी तसेच झोपडीधारकांच्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
#झोपडपट्टी #पुनर्वसन #प्राधिकरण #बृहन्मुंबई #महाराष्ट्रशासन
03/06/2026
एसआरए का डबल एक्शनः दिंडोशी में घर मालिक जीते, गोरेगांव में फर्जी सोसायटी बाहर
#झोपडपट्टी #पुनर्वसन #प्राधिकरण #बृहन्मुंबई #महाराष्ट्रशासन
03/06/2026
एसआरए शिबिरामध्ये झोपडीधारकांना दिलासा
#झोपडपट्टी #पुनर्वसन #प्राधिकरण #बृहन्मुंबई #महाराष्ट्रशासन
03/06/2026
झोपडपट्टीवासीयांच्या गुंतागुंतीच्या प्रकरणांवर सुनावणीचे आदेश
#झोपडपट्टी #पुनर्वसन #प्राधिकरण #बृहन्मुंबई #महाराष्ट्रशासन
01/06/2026
झोपडपट्टीमुक्त मुंबई आणि प्रत्येक गरजू कुटुंबाला सुरक्षित, दर्जेदार व हक्काचे घर मिळावे या उद्दिष्टपूर्तीसाठी एसआरए आता थेट जनतेच्या दारात पोहोचत आहे.
याच उपक्रमांतर्गत चेंबूर येथील शगुन हॉलमध्ये आयोजित समस्या निराकरण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचा एक हजारांहून अधिक झोपडीधारकांनी लाभ घेत आपल्या विविध समस्या व प्रश्नांचे निराकरण करून घेतले.
या उपक्रमाबाबत लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचे कात्रण
#झोपडपट्टी #पुनर्वसन #प्राधिकरण #बृहन्मुंबई #महाराष्ट्रशासन
30/05/2026
जुहू येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निष्कासनाची कारवाई यशस्वी
मौजे जुहू येथील नगर भूमापन क्र. 1209/1, 1209/2 व 1213 या शासकीय मिळकतीवरील अतिक्रमण निष्कासनाची कारवाई दि. 29/05/2026 व 30/05/2026 रोजी यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली.
सदर कारवाईदरम्यान सुमारे 70 अनधिकृत निवासी अनिवासी झोपड्या/बांधकामे निष्कासित करण्यात आली.
यामध्ये अंदाजे 8,000 चौ. फूट शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली.
अतिक्रमणमुक्त करण्यात आलेल्या जमिनीचे बाजारमूल्य सुमारे ₹80 कोटी इतके आहे.
ही कारवाई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार तसेच अपर जिल्हाधिकारी (अतिक्रमण/निष्कासन) पश्चिम उपनगर श्री. गणेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
सदर कारवाई उपजिल्हाधिकारी (अतिक्रमण निष्कासन),बांद्रा श्रीमती वैशाली परदेशी यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली.
या कारवाईसाठी महानगरपालिका व पोलीस विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या कारवाईमुळे मौल्यवान शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त होऊन शासनाच्या ताब्यात उपलब्ध झाली आहे. लवकरच या जमिनीस संरक्षण भिंत बांधली जाणार आहे.
#जुहू #मुंबई #अतिक्रमणनिष्कासन #शासकीयजमीन #अतिक्रमणमुक्त #शासनकारवाई #सार्वजनिकसंपत्ती #महाराष्ट्रशासन #जमीनसंरक्षण