06/06/2026
"सबका साथ, सबका विकास... सबका विश्वास, सबका प्रयास" या विचाराला कृतीची जोड देत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळाली आहे.
शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, रोजगार, वनहक्क आणि आर्थिक सक्षमीकरण अशा प्रत्येक क्षेत्रात घेतलेल्या दूरदृष्टीपूर्ण निर्णयांमुळे आदिवासी बांधव विकासाच्या मुख्य प्रवाहात अधिक सक्षमपणे सहभागी झाले आहेत.
आदिवासी परंपरा, संस्कृती आणि अस्मितेला राष्ट्रीयच नव्हे तर जागतिक स्तरावरही योग्य सन्मान मिळवून देण्याचे ऐतिहासिक कार्य या कालखंडात घडले आहे.
"विकासाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत" पोहोचविण्याच्या संकल्पनेतून उभारलेला हा प्रवास, समावेशक भारत आणि सक्षम आदिवासी समाजाच्या निर्मितीचा प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.
Narendra Modi Nitin Nabin Amit Shah Devendra Fadnavis Ravindra Chavan BJP Maharashtra
05/06/2026
मोदी सरकारची १२ वर्षे | विश्वास, विकास अन जनकल्याणाची..!
मंडलनिहाय वृक्षारोपण उपक्रम संपन्न..!
“राष्ट्र प्रथम” या संकल्पनेवर अखंड विश्वास ठेवत देशसेवेत कार्यरत असलेले माननीय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली एनडीए सरकारची ऐतिहासिक १२ वर्षे पूर्ण होत आहेत. गरीब, शोषित, वंचित घटकांच्या सक्षमीकरणापासून ते विकसित भारत या ध्येयापर्यंतचा हा प्रवास देशासाठी अभिमानास्पद आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. नितीन नबीनजी यांच्या नेतृत्वात, मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस व प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली "मोदी सरकारची १२ वर्षे - विश्वास, विकास, जनकल्याण" या अभियानांतर्गत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भोसरी विधानसभा मतदारसंघात मंडलनिहाय वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला.
यामध्ये इंद्रायणीनगर-नेहरूनगर मंडल, मोशी-चऱ्होली मंडल, दिघी-गवळीनगर-गव्हाणेवस्ती मंडल, चिखली-कृष्णानगर मंडल या ठिकाणी आजी माजी नगरसेवक, सर्व पदाधिकारी व सहकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
पर्यावरण संरक्षणातून जनकल्याण आणि विकास यांची सांगड घालत, हरित व समृद्ध भारताच्या संकल्प पूर्तीसाठी आम्ही सदैव कटीबद्ध आहोत..!
Narendra Modi Nitin Nabin Amit Shah Devendra Fadnavis Ravindra Chavan BJP Maharashtra
04/06/2026
राज्यसभा उमेदवारी जाहीर झालेल्या सर्व मान्यवर उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन..!
देशाचे पंतप्रधान मा. श्री नरेंद्रजी मोदी, केंद्रीय गृहमंत्री मा. श्री. अमितजी शहा आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. नितीनजी नबीन यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीच्या वतीने २०२६ साठी विविध राज्यांतील राज्यसभा द्विवार्षिक निवडणूक व उपनिवडणुकीसाठी जाहीर केलेल्या सर्व मान्यवर उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन...
देशाच्या विविध भागांचे प्रतिनिधित्व करणारे हे सर्व उमेदवार सामाजिक कार्य, संघटन कौशल्य, प्रशासकीय अनुभव आणि राष्ट्रसेवेच्या दृढ निष्ठेसाठी ओळखले जातात. त्यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून पक्षाने त्यांना ही जबाबदारी सोपवली, हा निर्णय लोकशाही मूल्यांना बळ देणारा आहे.
अरुणाचल प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, मणिपूर, राजस्थान तसेच ओडिशा येथील उमेदवारांच्या माध्यमातून राज्यसभा अधिक सक्षम, समतोल आणि विकासाभिमुख होईल, असा विश्वास आहे. या सर्व मान्यवरांचे योगदान संसदेत देशहितासाठी निर्णायक ठरेल.
राष्ट्रसेवा, सुशासन आणि विकासाच्या ध्येयासाठी सदैव कटीबद्ध.. भारतीय जनता पार्टी..!
Narendra Modi Nitin Nabin Amit Shah Devendra Fadnavis Ravindra Chavan BJP Maharashtra
03/06/2026
“मोदी सरकारची १२ वर्षे – विश्वास, विकास व जनकल्याणाची”
पश्चिम महाराष्ट्र विभाग – संघटनात्मक संपर्क दौरा | विभागीय आढावा बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या ऐतिहासिक कामगिरीची १२ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, “मोदी सरकारची १२ वर्षे – विश्वास, विकास व जनकल्याणाची” या कार्यक्रमांतर्गत पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या संघटनात्मक संपर्क दौऱ्याअंतर्गत पिंपरी-चिंचवड व पुणे उत्तर (मावळ) जिल्ह्याची विभागीय आढावा बैठक आज मोठ्या उत्साहात पार पडली.
‘राष्ट्र प्रथम’ या मूल्याधिष्ठित संकल्पनेतून सातत्याने सेवा देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, गरीब, शोषित आणि वंचित घटकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी तसेच ‘विकसित भारत’ या ध्येयपूर्तीसाठी सरकार वेगाने पुढे जात आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष मा. नितीन नबीनजी यांच्या नेतृत्वात व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली, या १२ वर्षांच्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेत जिल्ह्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या निमित्ताने आयोजित आढावा बैठकीत सरचिटणीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेश (विभाग समन्वयक) आ. निरंजन डावखरे, विभाग सहसंयोजक मा. विक्रम देशमुख, अभियान प्रदेश सहसंयोजक आ. विक्रम पाचपुते, मा. खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर, मा. खासदार अमर साबळे, जिल्हा प्रभारी भरत पाटील यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भाजपा पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष, मा. शत्रुघ्न (बापू) काटे, भाजपा पुणे उत्तर (मावळ) जिल्हा जिल्हाध्यक्ष मा. प्रदीपजी कंद यांनी भूषवले. या विभागीय आढावा बैठकीत संघटनात्मक बळकटीकरण, आगामी कार्यक्रमांची रूपरेषा आणि जनसंपर्काच्या प्रभावी अंमलबजावणीवर सखोल चर्चा झाली. विश्वास, विकास आणि जनकल्याण या त्रिसूत्रीवर आधारित मोदी सरकारच्या कार्याचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा दृढ संकल्प या बैठकीतून व्यक्त झाला.
Narendra Modi Nitin Nabin Amit Shah Devendra Fadnavis Ravindra Chavan BJP Maharashtra
03/06/2026
☀️ सौरऊर्जेकडे नागरिकांचा वाढता कल! 🌱⚡
पुणे परिमंडळातील तब्बल ३६,४१८ वीज ग्राहकांनी 'पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना' आणि 'पंतप्रधान कुसुम योजना'चा लाभ घेत सौरऊर्जेचा स्वीकार केला आहे. यामुळे १७८ मेगावॉट इतकी सौरऊर्जा निर्मिती क्षमता उभी राहिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्र सौरऊर्जा क्षेत्रात यशस्वी घोडदौड करीत आहे, याचे समाधान वाटते.
🏠 आपल्या घराच्या छतावर सौर प्रकल्प बसवा आणि:
✅ वीजबिलात मोठी बचत करा
✅ अतिरिक्त वीज महावितरणला विकून उत्पन्न मिळवा
✅ केंद्र व राज्य शासनाचे आकर्षक अनुदान मिळवा
✅ राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज सुविधेचा लाभ घ्या
📌 १ किलोवॅट प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून ₹३०,००० पर्यंत अनुदान
📌 ३ किलोवॅट व त्यापेक्षा अधिक क्षमतेसाठी ₹७८,००० पर्यंत अनुदान
🌞 स्वच्छ ऊर्जा, कमी खर्च आणि शाश्वत भविष्यासाठी आजच सौरऊर्जेचा स्वीकार करा!
Devendra Fadnavis Ravindra Chavan BJP Maharashtra
03/06/2026
विकसित भारताचा महामार्ग : दळणवळण क्षेत्रातील ऐतिहासिक परिवर्तन!
देशाच्या प्रगतीचा वेग ठरवणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे सक्षम आणि आधुनिक दळणवळण व्यवस्था. रस्ते, रेल्वे, मेट्रो, विमानतळ, बंदरे आणि जलवाहतूक यांचे मजबूत जाळे हेच आर्थिक विकासाचे खरे इंजिन असते. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत भारताने पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात अभूतपूर्व झेप घेतली आहे.
आज देशभरात आधुनिक एक्सप्रेस-वे, भव्य महामार्ग, वंदे भारतसारख्या अत्याधुनिक रेल्वे सेवा, वेगाने विस्तारत असलेली मेट्रो व्यवस्था, नव्या विमानतळांचे जाळे आणि विकसित होत असलेली जलवाहतूक व्यवस्था भारताच्या नव्या सामर्थ्याची साक्ष देत आहेत. हे परिवर्तन केवळ काँक्रीट आणि स्टीलचे नाही, तर देशातील कोट्यवधी नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवणारे आहे.
या विकासामुळे सामान्य नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित, आरामदायी आणि सुलभ झाला आहे. दुसरीकडे उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्रालाही नवसंजीवनी मिळाली आहे. लॉजिस्टिक खर्चात झालेली घट, मालवाहतुकीचा वाढलेला वेग आणि देशाच्या कानाकोपऱ्यांना मिळालेली जोडणी यामुळे भारताची अर्थव्यवस्था अधिक सक्षम बनत आहे.
आजचा भारत केवळ विकासाची स्वप्ने पाहत नाही, तर आधुनिक पायाभूत सुविधांच्या बळावर त्या स्वप्नांना वास्तवात उतरवत आहे. सक्षम दळणवळण, गतिमान अर्थव्यवस्था आणि आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करणारा भारत हेच नव्या युगातील राष्ट्रनिर्मितीचे प्रभावी चित्र आहे.
Narendra Modi Nitin Nabin Amit Shah Devendra Fadnavis Ravindra Chavan BJP Maharashtra
01/06/2026
भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन!
महाराष्ट्र विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ तसेच द्वैवार्षिक पोटनिवडणूक २०२६ साठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारी जाहीर झालेल्या सर्व उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो.
महाराष्ट्र विधान परिषद उमेदवार श्री. अरुण लखानीजी, श्री. अविनाश ब्राह्मणकरजी, श्री. प्रविण पोटे पाटील, श्री. धैर्यशील कदम, श्री. राजेंद्र राऊतजी, श्री. प्राजक्त तनपुरे, श्री. सुहास शिरसाटजी, श्री. अमर राजूरकर, श्री. बसवराज पाटीलजी, श्री. नंदकिशोर महाजन आणि डॉ. राजीव पोतदारजी यांना उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा!
सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा!
Devendra Fadnavis Ravindra Chavan BJP Maharashtra
26/05/2026
गौरव राष्ट्रसेवेचा..!
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा वारसा आयुष्यभर कृतीतून जपणारे, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस तथा ज्येष्ठ गुरुदेव भक्त श्री जनार्दन बोथे गुरुजी यांना राष्ट्रपती मा. द्रौपदी मुर्मूजी यांच्या हस्ते ‘पद्मश्री’ या प्रतिष्ठित नागरी सन्मानाने गौरविण्यात आले. सामुदायिक विकास, ग्रामीण उत्थान आणि संपूर्ण भारतात ग्रामगीता तत्त्वज्ञानाच्या प्रसारातील असामान्य योगदानाबद्दल 'पद्म श्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा संपूर्ण देशासाठी आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण आहे.
आदरणीय जनार्दन बापूराव बोथे जी यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
President of India