Revenue Department, Government of Maharashtra

Revenue Department, Government of Maharashtra

Share

महसूल विभाग, महाराष्ट्र शासन – अधिकृत फेसबुक पेज

मुंबई, महाराष्ट्र

https://rfd.maharashtra.gov.in/

https://mahabhumi.gov.in/mahabhumilink

Photos from Revenue Department, Government of Maharashtra's post 05/06/2026

भेंडी येथील १० वर्षांपासून बंद वहिवाट खुली

पावसाळ्यापूर्वी राज्यभरात पाणंद रस्त्यांच्या कामांना जोर

नाशिक जिल्ह्याच्या कळवण तालुक्यातील मौजे भेंडी येथील जुनी भेंडी ते काळा खडक हा रस्ता गेल्या दहा वर्षांपासून बंद होता. तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी संबंधित शेतकऱ्यांशी सामंजस्याने संवाद साधून मार्ग काढला. त्यांच्या प्रयत्नांमुळे रस्त्याची वहिवाट पुन्हा सुरू झाली असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शेतात ये-जा सुलभ होऊन कृषी कामांना गती मिळणार आहे.

#पाणंदरस्ते #महसूलविभाग

05/06/2026

जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
पर्यावरणाच्या रक्षणासाठी महसूल प्रशासन कटिबद्ध
महसूल विभाग, महाराष्ट्र शासन

#जागतिकपर्यावरणदिन
#महसूलविभागमहाराष्ट्र

04/06/2026

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरामुळे शासकीय सेवा आता थेट जनतेच्या दारी पोहोचत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

04/06/2026

YouTube link:
https://www.youtube.com/channel/UCrNl4GxS6FD9sDrkOHMZAUg

---
पाणंद रस्त्यांमुळे संपली बिबट्याची भीती... आता थेट घरापर्यंत रस्ते!

पुणे जिल्ह्याच्या बोरी बुद्रुक गावातील प्रेरणादायी परिवर्तनाची संपूर्ण कहाणी पाहण्यासाठी महसूल विभागाच्या YouTube चॅनेलला आजच सबस्क्राईब करा!

सदर माहितीपट ५ जून रोजी महसूल विभागाच्या YouTube चॅनेलवर प्रदर्शित करण्यात येणार आहे!

04/06/2026

पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती!

ई-हक्क प्रणालीद्वारे वारस नोंद, बोजा नोंद, फेरफार प्रस्ताव आदी सेवा आता ऑनलाइन उपलब्ध आहेत. आपल्या जमिनीच्या नोंदी अद्ययावत ठेवण्यासाठी आणि शेतीसंबंधित कामे सुलभ करण्यासाठी ही माहिती नक्की जाणून घ्या.

03/06/2026

YouTube चॅनलची लिंक :

https://www.youtube.com/channel/UCrNl4GxS6FD9sDrkOHMZAUg

बोरी बुद्रुक गावातील पाणंद रस्त्याचे प्रश्न कसे सुटले?
या विषयावरील सविस्तर माहितीपट पाहण्यासाठी आजच महसूल विभागाच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.
सदर माहितीपट ५ जून रोजी महसूल विभागाच्या YouTube चॅनेलवर प्रकाशित करण्यात येणार आहे!

Photos from Revenue Department, Government of Maharashtra's post 03/06/2026

अमरावतीतील 'मॉसिकॉल'ची जागा सरकारजमा करण्याचे
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश
जागा शासकीय इमारती आणि कामकाजासाठी वापरणार
महापालिकेकडूनही कार्यालयासाठी जागेची मागणी

अमरावती शहराच्या मध्यवर्ती भागातील 'मॉसिकॉल' (MOSICOL) कारखान्याची जमीन खाजगी व्यक्तींना विकण्याऐवजी सार्वजनिक आरक्षित कामांसाठी आणि शासकीय इमारतींच्या बांधकामासाठी महसूल विभागाकडे वर्ग करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला अमरावतीचे विधान परिषद सदस्य संजय खोडके, महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

03/06/2026

महत्वपूर्ण अपडेटसाठी महसूल विभागाच्या अधिकृत WhatsApp चॅनलला फॉलो करा!

WhatsApp चॅनल जॉईन करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा!

https://whatsapp.com/channel/0029VbCRlcdFSAsvfhcSqD1O

महसूल विभाग महाराष्ट्र शासन

Photos from Revenue Department, Government of Maharashtra's post 02/06/2026

"सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी कटिबद्ध...!"

नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज मंत्रालयात विशेष बैठक घेतली. मेळघाटातील आरोग्यविषयक परिस्थितीत सुधारणा करणे, दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात आधुनिक सुविधा उपलब्ध करणे आणि नागपूर जिल्ह्यातील विविध रुग्णालयांच्या श्रेणीवर्धनाच्या प्रस्तावांवर सकारात्मक चर्चा झाली. नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर जी, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ जी उपस्थित होते.

02/06/2026

महसूल विभाग, साप्ताहिक विशेष बुलेटीन

CMOMaharashtra Maharashtra DGIPR Chandrashekhar Bawankule Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address


Mantralaya, Churchgate, Mumbai 400020
Mumbai
40020