16/05/2025
दि. १५ मे २०२५ रोजी वसई-विरार शहर महानगरपालिका मुख्यालयात ‘प्लास्टिकमुक्त सार्वजनिक क्षेत्र‘ या विषयावरील कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमात मा. पुजा शिंदे (From Bisleri International Pvt.Ltd, CSR Department) यांनी मार्गदर्शन केले तसेच प्लास्टिक पुनर्वापर या विषयावर पथनाट्य करण्यात आले. सदर कार्यक्रमाला मा.उपायुक्त श्री. नानासाहेब कामठे, मा. उपायुक्त सौ.अर्चना दिवे महानगरपालिकेचे विविध अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
22/04/2025
वसुंधरा दिना निमित्त, पथनाट्य आणि सफाई कर्मचारी सन्मान दिनांक २२/०४/२०२५ रोजी चक्रेश्वर तलाव नालासोपारा येथे संपन्न झाला.
वसई विरार शहर महानगरपालिकेतील पर्यावरण विभाग, संयोगी संस्था अलाईड सोल्युशन सर्विसेस यांनी माझी वसुंधरा अभियान दिना निमित्त, पथनाट्य आणि सफाई कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशा प्रमाणे "पर्यावरण वाचवा, वसुंधरा सजवा" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा मध्ये मा. राजन नाईक आमदार नालासोपारा मतदार संघ, मा.अनिलकुमार पवार (IAS) आयुक्त तथा प्रशासक वसई विरार शहर महानगरपालिका, मा. संजय हेरवडे अतिरिक्त- आयुक्त वसई विरार शहर महानगरपालिका, मा. अजित मुठे उप- आयुक्त वसई विरार शहर महानगरपालिका आणि सर्व अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, उपस्थित होते.
वसई विरार महापालिका माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सातत्याने उपक्रम राबवत असून विविध उपक्रमाच्या या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करत आहे. त्याच बरोबर शहरातील प्रमुख ठिकाणी स्वच्छतेचे संदेश देण्यासाठी शहरात सुशोभीकरण केले आहे. यामुळे पालिकेच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
🌱 #स्वच्छतेचीसाथ #स्वच्छवसईविरार #स्वच्छता_मिशन
#स्वच्छभारतअभियान