05/06/2026
एकेकाळी रहिवाशांनी अभिमानाने जपलेली आणि मिरवलेली चाळ संस्कृती आज मालक, विकासक, प्रशासन आणि शासन यांच्या कचाट्यात सापडली असून, हजारो भाडेकरू भीती, असुरक्षितता आणि अनिश्चिततेच्या छायेखाली जीवन जगण्यास भाग पडले आहेत.
या रहिवाशांना त्यांच्या हक्काची घरे कधी मिळणार, की अन्यायाच्या या अखंड चक्रात ते एकामागून एक संपून जाणार?
हा प्रश्न आज प्रत्येक संवेदनशील नागरिकाने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे.
सत्य जाणून घ्या, परिस्थिती पहा आणि मग तुम्हीच ठरवा आणि पटल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा🙏🙏🙏
Mumbai | Redevelopment की फक्त आश्वासनं? | गिरगावातील जगन्नाथ चाळीचा प्रश्न ऐरणीवर | Navarashtra
...
25/05/2026
सुप्रभात,
आपल्या पुनर्विकासाच्या समस्यांची दखल मीडिया (gallinews) ने घ्यायला सुरुवात केली आहे 👆, आता तरी झोपायचे सोंग आणलेल्या म्हाडाने जागे व्हावे. मी रहिवाश्यांच्या आभार मानतो कि त्यांनी धाडस दाखवून आपली प्रतिक्रिया इकडे उघड पाने सादर केली.
धन्यवाद.
www.youtube.com
29/04/2026
फक्त लढ़ म्हणा!! कार्यवाही व्हायलाच हवी😡😡😡
25/04/2026
Our reality....and the fight continues.
15/08/2025
*स्वातंत्र्य दिन – आपण खरंच मुक्त आहोत का?*
दरवर्षी १५ ऑगस्टला तिरंगा उंच फडकतो, राष्ट्रगीताचे स्वर गल्लीबोळात घुमतात आणि आपण अभिमानाने त्या बलिदानांचा गौरव करतो ज्यामुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं.
१९४७ साली भारताने परकीय सत्तेची बेडी तोडून स्वतंत्र प्रजासत्ताक म्हणून डोकं वर केलं.
पण जेव्हा आपण दिवे लावतो, देशभक्तीची गाणी गातो आणि स्वातंत्र्याबद्दल बोलतो, तेव्हा आपल्या मनात एक प्रश्न घोळतो – आपण – *आपल्या चाळीतील रहिवासी – खरंच स्वतंत्र आहोत का?*
देशासाठी स्वातंत्र्य म्हणजे सन्मान, सुरक्षितता आणि संधी यांचा अधिकार. *पण आपल्या समाजाला आजही दुर्लक्ष, फसवणूक आणि अन्याय यांच्या सावलीत जगावं लागतं. दशकाहून अधिक काळापासून आपला पुनर्विकास – सुरक्षित घरे, मूलभूत सुविधा आणि सन्मानाने जगण्याचं वचन – खोट्या आश्वासनांच्या आणि सरकारी निष्क्रियतेच्या जाळ्यात अडकलेला आहे.*
*उत्सवाच्या मागचं वास्तव*
देश प्रगतीची भाषा बोलतो, पण *आपली कुटुंबं आजही गळकी छप्परं, ढासळणाऱ्या भिंती आणि असुरक्षित इमारतींमध्ये राहत आहेत.* आपण स्वातंत्र्य सैनिकांनी स्वप्नात पाहिलेल्या स्वातंत्र्यात नाही, तर आधुनिक काळातील गुलामीत जगत आहोत – जिथं विकासकांनी आपली जबाबदारी सोडली आणि सत्ताधाऱ्यांनी डोळेझाक केली.
*आपले प्रश्न:*
*हेच का आपल्याला दिलेलं स्वातंत्र्य?*
*फक्त भाषणं आणि मिरवणुकीपुरतंच का स्वातंत्र्य, आणि आमच्यासारखे नागरिक मागेच का राहतात?*
*जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत आपण अजूनही आपल्या मूलभूत हक्कांसाठी भीक का मागतो आहोत?*
*खऱ्या स्वातंत्र्याची हाक*
आपल्या चाळीला खरं स्वातंत्र्य तेव्हाच मिळेल जेव्हा प्रत्येक भाडेकरूकडे सुरक्षित, कायदेशीर घर असेल. जेव्हा सरकार फसवणुकीपासून आपलं रक्षण करेल आणि आपल्याला अडकवून ठेवणार नाही. जेव्हा न्याय मिळायला दशके लागणार नाहीत, तर तो त्वरित मिळेल आणि नागरिकांचा सन्मान राखेल.
या स्वातंत्र्य दिनी, जसा तिरंगा वाऱ्यात फडकतो, तसा तो फक्त भूतकाळातील लढ्याचा प्रतीक राहू नये, तर पुढे असलेल्या लढ्याची आठवण करून द्यावी – प्रत्येक भारतीयाच्या स्वातंत्र्यासाठीचा लढा, ज्यात आपल्या विस्मरणात गेलेल्या चाळीतील भाडेकरूंनाही स्थान मिळेल.
कारण आपली घरं स्वतंत्र होईपर्यंत, आपली मनं स्वतंत्र होऊ शकत नाहीत.
*जय हिंद🇮🇳🇮🇳🇮🇳*
08/08/2025
असत्य फार काळ टिकणार नाही☺️☺️☺️ पुढारी आणि नवराष्ट्र नंतर आज नवाकाळ नी आपल्या थकलेल्या प्रकल्पाची दखल घेतली आहे🙏🙏🙏
07/08/2025
नमस्कार 🙏🙏🙏
पुढारीनंतर आता आपल्या प्रकल्पाची दखल नवराष्ट्र या ऑनलाईन न्यूज पोर्टलनेही घेतली आहे. ही बाब आपल्या *वाडीतील माहेरवाशीण दीपाली नाफडे* यांच्या प्रयत्नातून शक्य झाली आहे, याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार.
आपल्या लढ्याला मिळत असलेला हा सार्वजनिक पाठिंबा निश्चितच प्रेरणादायी आहे.
https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai/girgaon-chawl-redevelopment-pil-mumbai-high-court-953198.html
धन्यवाद🙏🙏🙏
MHADA Redevelopment Dispute : जुन्या, धोकादायक इमारतींचा प्रश्न कायम! 14 वर्षांपासून पुनर्विकास रखडल्याने रहिवास
मुंबईत १४ हजारांवर सेस इमारती असून त्यापैकी ९० टक्क्यांहून अधिक चाळी, इमारती जीर्ण आहेत. राज्य सरकारने जुन्या, धो....
07/08/2025
*आपल्या थकलेल्या पुनर्विकासाची दखल*
नमस्कार 🙏🙏🙏
आजच्या पुढारी – *My Mumbai पुरवणीमध्ये* आपल्या *थकलेल्या पुनर्विकास* प्रकल्पाची दखल एका छोट्या बातमीच्या माध्यमातून घेतली गेली आहे. ही बातमी आपल्या संघर्षाची आणि सातत्याची पावती आहे – कृपया ती जरूर वाचा.
आपल्या मागण्यांना अधिक व्यापक आधार मिळावा यासाठी, माझं सगळ्यांना नम्र आवाहन आहे की ही बातमी आपल्या सोशल मीडिया हँडल्स व WhatsApp स्टेटसवर शेअर करा, जेणेकरून अधिकाधिक लोकांपर्यंत आपला आवाज पोहोचेल.
आमच्या संघर्षाची दखल घेतल्याबद्दल पुढारी आणि संपूर्ण माध्यम समूहाचे मन:पूर्वक आभार.
आपल्या सर्वांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्याबद्दल आम्ही नेहमीच ऋणी आहोत.
धन्यवाद! 🙏🙏🙏