Bhai Akash Nirmal

Bhai Akash Nirmal

Share

Yes

23/06/2026

"प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि जनसेवा हीच लोकसेवेची खरी ओळख आहे. समाजाप्रती समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या सर्व" तुकाराम मुंढे साहेबांसारख्या" प्रामाणिक लोकसेवकांना 'संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिना'च्या मनःपूर्वक शुभेच्छा!"

22/06/2026

पृथ्वीचे फुफ्फुस मानल्या जाणाऱ्या या पर्जन्यवनांचे संवर्धन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी ही वने अत्यंत महत्त्वाची आहेत.
​आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या दिनानिमित्त आपण सर्वजण निसर्गाच्या या अमूल्य ठेव्याचे रक्षण करण्याचा आणि झाडे लावून निसर्गाचा समतोल राखण्याचा संकल्प करूया.
​निसर्ग आणि मानवाचे नाते अधिक घट्ट होवो, हीच सदिच्छा! 🌿✨

21/06/2026

माझा बाप सखा पांडुरंग

जागोजागी खचलेल्या भागात
फक्त एके ठिकणी
उंचवटयाचा भाग होता
त्याच्या पाठीला पाठ लावून
मी विश्रांती घेतो
कारण, तो माझा बाप होता.

छत सांभाळता सांभाळता
ज्या दिवशी माझा बाप
कमरेतून वाकला
त्याच दिवशी
मला जगण्याचा अर्थ कळला.

त्याने कधीच स्वत:चा
गवगवा केला नाही
की तो उदंड झाला नाही
माझ्यासाठी तो कधीच
स्वतःच्या अस्तित्वाने जगला नाही.

निघून गेले सारे असे
हात रिकामे होते
त्याची आठवण म्हणून
रेषांचे दोन रेघोटे होते.

गरजेपुरते माझ्या बापाला
सर्वांनी गरीब गाय म्हटले
गरज संपताच
खाटिकाच्या खुंटीला बांधले.

कुणाला न बोलता
जेव्हा बाप आतून रडला
त्याचा खचलेला बांधा पाहून
मी ओलाचिंब डोळा मिटला.

आंगळलो बापाला मी
तो पारंब्यांसारखा होता
त्याचा स्वतःमध्ये नाही
तर, पिल्लामध्ये जीव होता.

कधी कधी त्यालाही
डोळ्यातले भाव लपवता येत नाहीत
बाप म्हणून पाहिले गेल्याने
साधे रडता सुद्धा येत नाही.

माझे पोट भरता भरता
एक दिवशी बाप उपाशी होता
विचारले तर म्हणाला
तोही माझ्याच
कर्तव्याचा एक भाग होता.

पोटाची कळही तो
डोळ्यातून ओळखायचा
ताठ कण्याचा बाप माझ्यासाठी
कित्येकदा मान ही वाकवायचा.

त्याने सन्मान पाहिला नव्हता
ना आनंद पाहिला होता.
आयुष्याशी झगडत-झगडत फक्त
आता त्याचा साचाच राहिला होता.

अंधारातला उजेड म्हणून बा
डोळ्याची दिवटी करायचा
माझ्या पोटात घास टाकून
तो स्वतःची भूक भागवयाचा.

वाळणाच्या दोरीगत नशीब
बापाला झुलवत होते
त्याच्या पिल्लाच्या सावलीसाठी
त्याने शरीराचे कवच केले होते.

बाप नेहमी मला
जत्रेला घेऊन जायचा
जग दावल्याचा आनंद
माझ्या डोळ्यात पाहायचा.

आता मीही बापाचा
एकलेपणा जाणला होता
वरवर हसणारा बाप
आतून खूपच दुखरा होता.

आयुष्याची प्रत्येक लढाई
बाप एकटाच लढला होता
भरल्या घरात राहून
कोपर्‍यातच विरला होता

माझ्यावरील प्रत्येक संकटात
तो खिंड म्हणून लढला
अनंत वार झेलण्यासाठी
ढाल होऊन जगला.

दिवसभराचा कणखर बाप
रात्रीला मात्र हळवा व्हायचा
पापणीतल्या अश्रूंसारखाच
तो ही अलगद बरसायचा.

कधी कधी वाटते
खरेच बाप काय असतो?
ज्याला कळले नाही त्याला तर
तो फक्त प्रश्नच असतो.

हिरव्या पानासारखा बाप ही
नंतर आतुन सुरकुतून गेला
फक्त माझ्यासाठीच निर्जीव म्हणून
देठाला चिकटून राहिला.

त्या दिवशी बापाने भाकरी थापली
कळू नये म्हणून,
आईच्या नावाने सांगितली
बोललो नाही बापाला,
पण, त्या भाकरीची चव
थोडी वेगळीच लागली.

पिकलेल्या पानाच्या देठागत
बाप अगदीच सुकला
जगण्याच्या प्रत्येक आनंदाला
तो वंचित राहीला.

सुख वाटता वाटता
माझा बाप रिक्त राहून गेला
जीवनाच्या प्रत्येक पायरीवर
तो मुक्त होत गेला.

बापचा संवाद नेहमी
थोडकाच राहायचा
बोललेला प्रत्येक शब्द
काळजात रुजायचा.

बाप नावाचा माणूस
एकटाच लढत असतो
सर्वांनी ओलांडला तरी तो मात्र
उंबरठा सांभाळत असतो.

माझ्या वडीलांना समर्पित

सदैव आपलाच ऋणी

#भाई आकाश पांडुरंग निर्मळ

सर्व वडीलधारी मंडळींना जागतिक वडील दिनानिमित्त मनःपुर्वक शुभेच्छा

21/06/2026

गाथा तुकारामची.. आहे सत्य व सरळ..!
सत्याचे कार्य तुकारामाचे.. नाही तिथे भेसळ..!
धान्य दाणे विषारी.. पिण्याचे पाणी पण जहरी..
भेसळ झाली ती अन्नाची जिवाची होई तळमळ..!

21/06/2026

निसर्गाशी एकरूप होण्याचा, मन:शांती व आरोग्य साधण्याचा संदेश देणारा आंतरराष्ट्रीय योग दिन
"योग करा, निरोगी राहा...! शरीर, मन आणि आत्मा यांची एकात्मता साधणारा योग आपल्याला दीर्घायुष्य, शांती आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो."

#आंतरराष्ट्रीययोगदिन #योगसाधना #निरोगीभारत

#जागतिक_योग_दिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा

20/06/2026

कवी कोण असु दे!
पण ख-याला खरं म्हणतांना कचरू नये
कवीने स्वतःच्या अभिमान व पाठीचा कणा ठेवावा ताठ..
कवीने कुठं ही मनसोक्त हुदडावं हिंडावं पण होऊ नये कधीच कोणाचा भाट...!

20/06/2026

#भगतसिंग
#बिचार

20/06/2026


#महावितरण

आपल्या जिवाशी खेळाडू आम्हाला दररोज रात्री प्रकाश देणाऱ्या सर्व विद्युत कामगारांना महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ स्थापना दिनाच्या मनःपुर्वक शुभेच्छा...

18/06/2026

दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांनी कॉम्रेड कृष्णा देसाई यांचा खुन करुन नावारूपाला आलेल्या शिवसेनेत जाण्यापेक्षा क्रांतीकारांच्या शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करायला पाहिजे असे माझे वैयक्तिक मत आहे!

18/06/2026

तेव फोनराजे खासदार कुठं हाय रं..!

Want your business to be the top-listed Government Service in Nerul?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


Mahalaxmi Shopping Complex, Shop No/06 And 07, Near Manak Hospital, Below Rajiv Gandhi Bridge, Nerul Sector/02, Navi Mumbai
Nerul
400706