Aam Aadmi Party Maharashtra - Kamgar Aghadi

Aam Aadmi Party Maharashtra - Kamgar Aghadi

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aam Aadmi Party Maharashtra - Kamgar Aghadi, Political organisation, Pune.

✊ जिथे कामगार, तिथे संघटन!
आमचे कार्य:
🔹 कामगारांना किमान वेतन, PF, ESIC व इतर कायदेशीर हक्क मिळवून देणे
🔹 ठेकेदार व कंपन्यांकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात संघर्ष
🔹 कामगारांना कायदेशीर मार्गदर्शन व सहाय्य
🔹 संघटनबांधणी करून कामगारांना एकत्र आणणे

16/05/2026

🚩 आम आदमी पार्टी – कामगार आघाडी, पिंपरी चिंचवड 🚩

📢 भव्य सदस्य नोंदणी मोहीम 📢

🗓️ दिनांक : ३० मे २०२६
📍 ठिकाण : एलप्रो मॉल समोर, पिंपरी चिंचवड बस स्टॉप जवळ, पिंपरी चिंचवड, पुणे
वेळ : दुपारी २ ते ६:३० वाजता

✊🏻 कामगारांच्या हक्कासाठी… न्यायासाठी… सन्मानासाठी…
✊🏻 कामगारांच्या हितासाठी कामगारांच्या रक्षणासाठी!

✅ किमान वेतन
✅ बोनस व PF हक्क
✅ सुरक्षित रोजगार
✅ अन्यायाविरोधात लढा
✅ कामगारांना कायदेशीर मदत
✅ संघटित शक्ती निर्माण करण्यासाठी सदस्य नोंदणी

💪 जिथे कामगार… तिथे संघटन!
💪 संघटित कामगारच मजबूत कामगार!

आजच कामगार आघाडीशी जोडून आपल्या हक्काच्या लढ्यात सहभागी व्हा.
आपल्या हक्कासाठी, आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी आणि सुरक्षित रोजगारासाठी एकत्र येऊया!

👥 आपले विश्वासू

लक्ष्मण माने
कार्याध्यक्ष (कामगार आघाडी)
पिंपरी चिंचवड

वैजनाथ शिरसाट
शहराध्यक्ष
पिंपरी चिंचवड महानगरपालिका

रविराज काळे
प्रदेश अध्यक्ष,
युवा आघाडी, महाराष्ट्र राज्य

संजय कोने
प्रदेश संघटक (कामगार आघाडी)
आम आदमी पार्टी, महाराष्ट्र राज्य

अमित म्हस्के
प्रदेश समन्वयक
आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य

#कामगारआघाडी #कामगारएकता #जिथेकामगारतिथेसंघटन #कामगारांचाआवाज #कामगारहक्क

15/05/2026

लोकशाहीत सत्य कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी सत्याचाच विजय होतो! ✊

दिल्ली एक्साईज प्रकरणात जस्टिस स्वरणा कांता शर्मा यांनी सुनावणीतून माघार घेतल्यानंतर पुन्हा एकदा हे स्पष्ट झाले की, जनतेच्या आवाजाला आणि सत्याला कायम दबवता येत नाही.

Arvind Kejriwal यांनी म्हटल्याप्रमाणे — “गांधीजींच्या सत्याग्रहाचा विजय झाला!” 🇮🇳

सत्ता, दबाव आणि खोट्या आरोपांपेक्षा सत्य आणि नैतिक शक्ती मोठी असते!

Photos from Aam Aadmi Party Maharashtra - Kamgar Aghadi's post 15/05/2026

🚨 पुणे महानगरपालिकेतील ‘बोगस भरती’चा महाघोटाळा उघड! 🚨
सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या स्वप्नांवर डल्ला मारणाऱ्या भ्रष्ट टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी आम आदमी पार्टी युवा आघाडी मैदानात उतरली आहे! ✊

📌 पुणे महानगरपालिकेच्या २०२२ मधील सरळसेवा भरती प्रक्रियेत तब्बल २२५ तरुणांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक आरोप.

💰 प्रत्येक उमेदवाराकडून तब्बल ४५ लाख रुपये उकळल्याची माहिती समोर!
📑 बनावट सह्या, बनावट नियुक्ती आदेश आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर करून कोट्यवधींचा घोटाळा.
⚠️ एकूण गैरव्यवहार १०० कोटींपेक्षा जास्त असल्याची शक्यता!

👥 राजेंद्र खेडेकर, नमिता बनसोडे आणि शिवानंद पाटील यांच्या टोळीवर गंभीर आरोप.

🗣️ “हा केवळ आर्थिक गुन्हा नाही, तर तरुणांच्या भविष्याशी केलेला विश्वासघात आहे. मुख्य सूत्रधारांना तात्काळ अटक झाली पाहिजे!”
— Raviraj Baban Kale, प्रदेशाध्यक्ष, युवा आघाडी, महाराष्ट्र

📢 आम आदमी पार्टी, महाराष्ट्र युवा आघाडी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्याकडे SIT चौकशीची मागणी करणार असून दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत लढा सुरू राहील!

📍 पत्रकार परिषदेस उपस्थित:
Raviraj Kale - प्रदेश अध्यक्ष - युवा आघाडी
Amit Mhaske – प्रदेश समन्वयक,
Sanjay Kone– प्रदेश संघटक, कामगार आघाडी
Rishikesh Kanawate – उपाध्यक्ष, युवा आघाडी
Shubham Chavan – सचिव, युवा आघाडी
Subhash Karande – महासचिव, पुणे शहर
आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Photos from Aam Aadmi Party Maharashtra - Kamgar Aghadi's post 15/05/2026

🚨 पुणे महानगरपालिकेतील ‘बोगस भरती’चा महाघोटाळा उघड! 🚨
सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या स्वप्नांवर डल्ला मारणाऱ्या भ्रष्ट टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी आम आदमी पार्टी युवा आघाडी मैदानात उतरली आहे! ✊

📌 पुणे महानगरपालिकेच्या २०२२ मधील सरळसेवा भरती प्रक्रियेत तब्बल २२५ तरुणांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक आरोप.

💰 प्रत्येक उमेदवाराकडून तब्बल ४५ लाख रुपये उकळल्याची माहिती समोर!
📑 बनावट सह्या, बनावट नियुक्ती आदेश आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर करून कोट्यवधींचा घोटाळा.
⚠️ एकूण गैरव्यवहार १०० कोटींपेक्षा जास्त असल्याची शक्यता!

👥 राजेंद्र खेडेकर, नमिता बनसोडे आणि शिवानंद पाटील यांच्या टोळीवर गंभीर आरोप.

🗣️ “हा केवळ आर्थिक गुन्हा नाही, तर तरुणांच्या भविष्याशी केलेला विश्वासघात आहे. मुख्य सूत्रधारांना तात्काळ अटक झाली पाहिजे!”
— Raviraj Baban Kale, प्रदेशाध्यक्ष, युवा आघाडी, महाराष्ट्र

📢 आम आदमी पार्टी, महाराष्ट्र युवा आघाडी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्याकडे SIT चौकशीची मागणी करणार असून दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत लढा सुरू राहील!

📍 पत्रकार परिषदेस उपस्थित:
Amit Mhaske – प्रदेश समन्वयक,
संजय कोने – प्रदेश संघटक, कामगार आघाडी,
Rishikesh Kanawate – उपाध्यक्ष, युवा आघाडी,
Shubham Chavan – सचिव, युवा आघाडी,
Subhash Karande – महासचिव, पुणे शहर
आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

#भ्रष्टाचार_बंद_करा #आमआदमीपार्टी #युवा_आघाडी #पुणे

15/05/2026

लोकशाहीत सत्य कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी सत्याचाच विजय होतो! ✊

दिल्ली एक्साईज प्रकरणात जस्टिस स्वरणा कांता शर्मा यांनी सुनावणीतून माघार घेतल्यानंतर पुन्हा एकदा हे स्पष्ट झाले की, जनतेच्या आवाजाला आणि सत्याला कायम दबवता येत नाही.

Arvind Kejriwal यांनी म्हटल्याप्रमाणे — “गांधीजींच्या सत्याग्रहाचा विजय झाला!” 🇮🇳

सत्ता, दबाव आणि खोट्या आरोपांपेक्षा सत्य आणि नैतिक शक्ती मोठी असते!

#आमआदमीपार्टी #सत्याचा_विजय

Photos from Aam Aadmi Party Maharashtra - Kamgar Aghadi's post 13/05/2026

🚨 कोल्हापुरातील शंभर कोटी रस्ते प्रकल्पातील कामे अद्याप अपूर्ण का?
आम आदमी पार्टीचा आयुक्तांच्या बैठकीत थेट सवाल! ✊

कोल्हापूर शहरातील विविध नागरिक प्रश्नांवर आज आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांची भेट घेत शहरातील गंभीर समस्या मांडल्या.

🔹 दोन वर्षांपूर्वी सुरू झालेला ₹100 कोटी रस्ते प्रकल्प अद्याप अपूर्ण असून गटार चॅनेल, सील कोट यांसारखी कामे रखडलेली आहेत.
🔹 टिप्पर चालकांच्या कंत्राटातील कथित घोटाळ्याची चौकशी पूर्ण न करता संबंधित कंपन्यांना नवीन कामे देऊ नयेत, अशी मागणी करण्यात आली.
🔹 भटक्या कुत्र्यांसाठी डॉग शेल्टर, नसबंदी मोहीम, हवा प्रदूषण नियंत्रण, ई-बस खरेदी, पाणी गळती रोखणे, ई-गव्हर्नन्स प्रणाली यांसारख्या विषयांवर आप ने ठोस भूमिका मांडली.
🔹 महापालिकेतील रिक्त पदांमुळे नागरिक सेवा प्रभावित होत असल्याने तातडीने भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

आयुक्तांनी टिप्पर चालकांच्या प्रश्नावर तातडीची बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

यावेळी प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई, शहराध्यक्ष उत्तम पाटील, महासचिव अभिजित कांबळे, संजय नलवडे, दुष्यंत माने, विजय हेगडे, राकेश गायकवाड, इस्थेर कांबळे, मयूर भोसले, शिवानी गजबर, प्रथमेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

✊ जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष सुरूच राहील!
✊ काम नाही तर जवाब द्या!

#भ्रष्टाचार #कोल्हापूर #जनतेचाप्रश्न

Photos from Aam Aadmi Party Maharashtra - Kamgar Aghadi's post 12/05/2026

🚨 महा मेट्रोतील कंत्राटी कामगारांवर अन्याय बंद करा! 🚨

पुणे शहराची लाईफलाईन असलेल्या महा मेट्रो मध्ये काम करणाऱ्या सुरक्षा रक्षक व सफाई कामगारांच्या पगारातून नियमितपणे ESIC ची कपात केली जाते… पण अनेक कामगारांना आजपर्यंत ई-पहचान (ESIC) कार्ड देण्यात आलेले नाही!

यामुळे हजारो कंत्राटी कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना — ❌ मोफत उपचार
❌ शस्त्रक्रिया सुविधा
❌ आरोग्य विमा लाभ
❌ वैद्यकीय सेवा

यापासून वंचित राहावे लागत आहे.

👉 आम आदमी पार्टी कामगार आघाडी तर्फे महा मेट्रो प्रशासनाला स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की —

⚠️ जोपर्यंत सर्व कामगारांना ESIC ई-पहचान कार्ड दिले जात नाही,
⚠️ त्यांच्या कुटुंबीयांची नोंद अपडेट केली जात नाही,
⚠️ आणि आरोग्य सेवा प्रत्यक्ष मिळत नाही,

तोपर्यंत संबंधित ठेकेदारांची कोणतीही बिले अदा करू नयेत!

अन्यथा,
✊ कंत्राटी कामगारांच्या न्यायासाठी
✊ आम आदमी पार्टी कामगार आघाडी रस्त्यावर उतरून
✊ महा मेट्रो विरोधात तीव्र आंदोलन छेडेल!

कामगारांच्या हक्कासाठी लढा सुरूच राहील!
“कामगारांचा हक्क — कुणाच्याही बापाची जागीर नाही!”

✍️ नितीन कुटे पाटील
कार्याध्यक्ष, आप कामगार आघाडी पुणे शहर

✍️ संजय कोने
प्रदेश संघटक (कामगार आघाडी)
आप – महाराष्ट्र राज्य

#कामगारआघाडी #महाMetro #ईपहचानकार्ड #कामगारहक्क #कामगारएकता ✊

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address

Pune