Bappu Mankar- 24 Taas Janseva Karyalay

Bappu Mankar- 24 Taas Janseva Karyalay

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bappu Mankar- 24 Taas Janseva Karyalay, Public Service, Sadashiv Peth, Pune.

प्रभाग २५: शनिवार पेठ- महात्मा फुले मंडईचे भाजपा नगरसेवक व विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालयाचे अध्यक्ष मा. राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या '२४ तास जनसेवा कार्यालया'चे अधिकृत पेज

Photos from Bappu Mankar- 24 Taas Janseva Karyalay's post 12/06/2026

📍रामेश्वर चौक, शुक्रवार पेठ

आपल्या प्रभागातील रामेश्वर चौक येथील भुतकर हौद येथे विद्युत दिवे बंद पडल्याने परिसरात अंधार पसरला होता. याबाबत नागरिकांकडून माहिती मिळताच, तातडीने आपल्या नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर २४ तास जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून नवे विद्युत दिवे बसविण्यात आले.
Raghvendra Bappu Mankar

Photos from Bappu Mankar- 24 Taas Janseva Karyalay's post 12/06/2026

📍सुभाषनगर, शुक्रवार पेठ
आपल्या प्रभागातील १२६१, शुक्रवार पेठ, सुभाषनगर गल्ली क्रं- ६ येथील काशी निवास या सोसायटी च्या बाहेर असलेले चेंबर पदपथाच्या खाली झाकले गेले होते. तसेच त्यात गाळ साचल्याने ड्रेनेज तुंबत होते. त्यामुळे सोसायटीत दुर्गंधी पसरत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी नगरसेवक राघवेंद्र बाप्पू मानकर २४ तास जनसेवा कार्यालयाकडे केली होती. सदर ठिकाणी पदपथाच्या खाली गेलेले चेंबर उघडून ग्रॅब मशीन लावून गाळ काढण्यात आला व ड्रेनेज लाईन साफ करण्यात आली. तसेच, चेंबर पदपथाच्या समपातळीत घेण्यासाठी उंची वाढविण्यात आली.
Raghvendra Bappu Mankar

Photos from Bappu Mankar- 24 Taas Janseva Karyalay's post 11/06/2026

📍 शुक्रवार पेठ, सदाशिव पेठ

आपल्या प्रभागातील अनेक ठिकाणी झाडाच्या वाढलेल्या फांद्या धोकादायक ठरत असल्याबाबत नागरिकांकडून तक्रार येत होती. स्थानिक नागरिक व व्यापारी यांच्याकडून या फांद्या छाटण्याबाबतची मागणी नगरसेवक राघवेंद्र बाप्पू मानकर २४ तास जनसेवा कार्यालयाकडे केली होती. त्या संदर्भात संबंधित विभागाशी संपर्क साधून कार्यवाही करण्यात आली.
Raghvendra Bappu Mankar

Photos from Bappu Mankar- 24 Taas Janseva Karyalay's post 11/06/2026

📍 बदामी हौद चौक, शुक्रवार पेठ
आपल्या प्रभागातील बदामी हौद चौक भागातील कॅास्मिक सोसायटी येथील ड्रेनेज लाईन तुंबल्याने सोसायटी मधे अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली होती. याबाबतची तक्रार स्थानिक नागरिकानीं नगरसेवक राघवेंद्र बाप्पू मानकर २४ तास जनसंपर्क कार्यालयाकडे केली होती. यावर तावरीत कार्यवाही सुरु करण्यात आली. सोसायटी बाहेरील ड्रेनेज चेंबर डांबरी रस्त्याच्या पातळीच्या खाली गेले असल्याने ब्रेकर मशीन लावून, ड्रेनेज लाईन साफ करण्यात आले. तसेच, रस्त्या खालील पातळीवर गेलेले चेंबर समतल पातळीवर घेण्यात आले.
Raghvendra Bappu Mankar

Photos from Bappu Mankar- 24 Taas Janseva Karyalay's post 10/06/2026

📍शनिपार ते नागनाथपार, सदाशिव पेठ । पावसाळी जालवाहिन्यांची स्वच्छता..

आपल्या प्रभागातील सदाशिव पेठ भागातील रमेश डाईंग, शनिपार ते नागनाथपार चौक दरम्यानच्या रस्त्यावरील पावसाळी जलवाहिन्यांची स्वच्छता करण्यात आली. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी साचू नये यासाठी नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर २४ तास जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्यात आले.


Photos from Bappu Mankar- 24 Taas Janseva Karyalay's post 10/06/2026

📍वर्तक बाग, शनिवार पेठ | विद्युत दिव्यांची सोय..

आपल्या प्रभागातील वर्तक बाग येथे असलेल्या स्वर्गीय गोपाळराव उर्फ आबा पटवर्धन सांस्कृतिक कट्टा येथे २०० वॅटचे क्षमतेचे ४ नवे हॅलोजन बसविण्यात आले. ओंकार ग्रुप व वर्तक बागेत येणारे व्यायामप्रेमी, ज्येष्ठ नागरिक यांच्या माध्यमातून आपल्या राघवेंद्र बाप्पु मानकर २४ तास जनसेवा कार्यालयाला याबाबत मागणी करण्यात आली होती. याठिकाणी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. यावेळी पुरेशी प्रकाशव्यवस्था व्हावी या उद्देशाने ही मागणी पूर्ण करण्यात आली.
Raghvendra Bappu Mankar

#विद्युत #दिवे

09/06/2026

📍नागनाथपार, सदाशिव पेठ | मिशन स्वच्छ प्रभाग-२५

आपल्या राघवेंद्र बाप्पु मानकर २४ तास जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून अविरतपणे सुरू असलेल्या मिशन स्वच्छ प्रभाग-२५ अंतर्गत मधुलता बिल्डिंग, नागनाथपार, सदाशिव पेठ परिसरातील स्वच्छता करण्यात आली व जमा झालेला कचरा त्वरित मिशन स्वच्छ प्रभाग-२५ च्या कचरा गाडीच्या माध्यमातून उचलण्यात आला.


Photos from Bappu Mankar- 24 Taas Janseva Karyalay's post 09/06/2026

📍म. फुले मंडई परिसर, शुक्रवार पेठ । साखरे महाराज मठाचा ड्रेनेज प्रश्न सुटला..

आपल्या प्रभागातील महात्मा फुले मंडई, शुक्रवार पेठ परिसरात असलेल्या साखरे महाराज मठ येथे ड्रेनेज सतत तुंबत होते. याठिकाणचा हा प्रश्न कायम स्वरूपी सोडविण्याच्या हेतूने सहा इंची व्यासाची नवी ड्रेनेज लाईन टाकण्यात आली आहे. राघवेंद्र बाप्पु मानकर २४ जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्यात आले.


#ड्रेनेज #स्वच्छता

Photos from Bappu Mankar- 24 Taas Janseva Karyalay's post 08/06/2026

📍बाल विकास मित्र मंडळ ट्रस्ट, शनिवार पेठ | सुरक्षित प्रभाग-२५

आपल्या प्रभाग २५ मधील विविध परिसर सुरक्षित रहावे या हेतूने विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा संच बसवण्याचा ‘सुरक्षित प्रभाग-२५‘ उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमा अंतर्गत शनिवार पेठ येथील बाल विकास मित्र मंडळ ट्रस्ट च्या आवारात कॅमेरा संच बसविण्यात आला आहे.



#सुरक्षितप्रभाग२५

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Address


Sadashiv Peth
Pune
411030