04/06/2026
YASHADA organised the training programme “Decoding Data: Essential Analytics for Public Servants” from 1–3 June 2026 for Class I and Class II Officers from various Government Departments.
Conducted under the guidance of Shri Shahuraj More, Course Director, with support from Smt. Kavita Yadav, Assistant Course Director, and Shri Tanveer Inamdar, Facilitator, the programme focused on enhancing the capacity of officers to effectively use data for governance and public service delivery.
The sessions covered government data sources, Excel-based analysis, Power BI visualisation, GIS tools, and citizen feedback analysis, equipping participants with practical skills for evidence-based decision-making, planning, monitoring, and improved service delivery.
04/06/2026
Foundation Training Programme for Assistant Town Planners & Planning Assistants या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १ जून २०२६ ते ३ जुलै २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ दिनांक १ जून २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या उद्घाटन कार्यक्रमास यशदा संस्थेचे श्री. शेखर गायकवाड, भा.प्र.से. आणि श्रीमती पौर्णिमा गायकवाड, भा.पो.से. तसेच नगर रचना विभागाचे संचालक, महासंचालक तसेच इतर वरिष्ठ अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये राज्यातील सहाय्यक नगर रचनाकार व नियोजन सहाय्यक यांना नगर नियोजन, विकास आराखडे, शहरी विकास, प्रशासकीय प्रक्रिया तसेच संबंधित विषयांबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उद्घाटन सत्रामध्ये उपस्थित मान्यवरांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
04/06/2026
नवी दिल्लीतील लोकसभा सचिवालयाच्या संशोधन आणि ग्रंथालय विभागात कार्यरत अधिकाऱ्यांसाठी यशदा येथे १ ते ५ जून दरम्यान क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
लोकसभा संशोधन व प्रशिक्षण संस्था (PRIDE) प्रायोजित या पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन यशदाच्या ग्रंथालय विभागामार्फत करण्यात आले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) संशोधन आणि ग्रंथालय व्यवस्थापनामध्ये प्रभावी वापर कसा करता येईल, यावर विविध मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात —
🔹 ग्रंथालयांवरील कृत्रिम बुद्धिमत्तेचा परिणाम
🔹 आधुनिक तंत्रज्ञान
🔹 AI आणि डिजिटल ज्ञान व्यवस्थापन
या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होत आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमात २३ प्रशिक्षणार्थी अधिकारी सहभागी झाले आहेत.
कार्यक्रमाचे उद्घाटन यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमहासंचालक पौर्णिमा गायकवाड तसेच ‘PRIDE’चे संचालक पी. के. मल्लिक उपस्थित होते.
या प्रशिक्षण कार्यक्रमात तज्ज्ञ मार्गदर्शक चेतन टाकसाळे, डॉ. राजेंद्र कुंभार, विश्वास हसे आणि प्रल्हाद जाधव मार्गदर्शन करत आहेत.
कार्यक्रमांतर्गत Central Library Goa आणि Goa Legislative Assembly येथे अभ्यासभेटही आयोजित करण्यात आली आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे सत्रसंचालक म्हणून शशिकांत चौधरी यांनी, तर सहयोगी सत्र संचालक म्हणून विनय कुलकर्णी यांनी काम पाहिले.
24/05/2026
यशदाच्या माध्यम व प्रकाशन केंद्राच्यावतीने शुक्रवार, दि. २२ मे २०२६ रोजी एकदिवसीय लेखन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यशाळेचे उद्घाटन यशदाचे महासंचालक डॉ. सुहास दिवसे यांच्या हस्ते झाले. यावेळी अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, उपमहासंचालक पौर्णिमा गायकवाड, उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा सहयोगी प्राध्यापक राजीव नंदकर, मिलिंद जोशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यशाळेत प्रभावी वक्ते मिलिंद जोशी, दैनिक लोकमतचे संपादक संजय आवटे, ज्येष्ठ लेखिका रेणू दांडेकर, यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा सहयोगी प्राध्यापक राजीव नंदकर इत्यादी मान्यवरांची मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे सत्रसंचालक म्हणून डॉ. किरण धांडे यांनी काम पाहिले. तर सहसत्रसंचालक म्हणून व्यंकटेश कल्याणकर आणि सत्रसहाय्यक म्हणून सार्थक थोरवत यांनी काम पाहिले.
20/05/2026
विकसित महाराष्ट्राचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या क्षमता विकासाचा विचार करावा लागेल. त्यासाठी क्षमता बांधणी आराखडा निर्मिती हा महत्वाचा टप्पा असून अधिकाऱ्यांनी कर्तव्यासोबत नव्या गोष्टी जाणून घेत आपली वैयक्तिक प्रगती साधण्याचा आनंद घेण्यासाठी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी केले.
यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे क्षमता बांधणी आराखड्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या. कार्यशाळेला यशदाचे महासंचालक डॉ. सुहास दिवसे, उपसंचालक सचिन कलंत्रे, सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव नीता शिंदे, डिजिटल लर्निंग लॅब प्रमुख कल्याणी गोखले, संचालक शाहूराज मोरे आदी उपस्थित होते.
श्रीमती व्ही. राधा म्हणाल्या, प्रशासनाच्या शेवटच्या स्तरावरील कर्मचाऱ्याच्या क्षमता बांधणीचा विचारही आराखडा तयार करतांना करायचा आहे. प्रत्येक पदासाठी आवश्यक कौशल्य, तंत्रज्ञान आदींचा विचार करून प्रशिक्षण वेळापत्रक तयार करावे. प्रत्येक पदानुसार कर्तव्य आणि जबाबदाऱ्या निश्चित करून त्याअनुषंगाने आराखडा तयार करावा. कार्यत्मक आणि वर्तणूक संदर्भातील क्षमतांना विविध टप्प्यात आत्मसात करण्याजोगा प्रशिक्षण आराखडा तयार करावा.
अधिकाऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करून क्षमता बांधणी आराखडा तयार करण्यात घेतलेला पुढाकार लक्षात घेता महाराष्ट्र हे क्षमता बांधणी कार्यक्रमात अग्रेसर राहील, असं विश्वास त्यांनी व्यक्त केला. उत्तम कार्यक्षमतेद्वारे चांगली सेवा देण्यासाठी आणि त्या माध्यमातून राज्याला विकासाच्या वाटेवर पुढे नेण्यासाठी हॅ उपक्रम उपयुक्त ठरेल, असं विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
डॉ. दिवसे यांनीदेखील यावेळी मार्गदर्शन केले. नियमाधारित ऐवजी भूमिका आधारित प्रशासनाचा विचार करून क्षमता बांधणी आराखडा तयार करायचा आहे. या प्रशिक्षण आराखड्याला पदोन्नती आणि सेवा विषयक बाबींशी जोडण्यात येणार असल्याने अत्यंत सूक्ष्मरितीने आराखडा तयार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी श्री. कलंत्रे यांनी क्षमता बांधणी आराखडा तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले आणि अधिकाऱ्यांच्या शंकाचे निरसन केले. विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या आराखड्याचे सादरीकरण केले.
19/05/2026
प्रशासनाला अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि डिजिटल स्वरूप देणारी “ई-मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली” (E-HRMS) महत्वपूर्ण ठरणार आहे. याबाबत आज यशदा येथे अपर मुख्य सचिव मा. राधा मॅडम यांनी नेतृत्वाखाली बैठक संपन्न झाली. यावेळी यशदाचे महासंचालक मा.डॉ.सुहास दिवसे यांच्यासह यशदातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान मा. राधा मॅडम यांनी E-HRMS प्रणालीमागील मूलभूत संकल्पना, तिची प्रशासनातील आवश्यकता तसेच शासनातील मानव संसाधन व्यवस्थापन अधिक सक्षम, गतिमान आणि परिणामकारक करण्यातील तिची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. प्रशासनातील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कार्यक्षमता वृद्धिंगत करण्यासाठी ही प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनीही आपल्या अनुभवांवर आधारित सूचना, अपेक्षा आणि मते मांडत या उपक्रमाला अधिक प्रभावी व लोकाभिमुख बनविण्याच्या दृष्टीने सकारात्मक सहभाग नोंदविला. शासनाच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल आधुनिक, सुसंगत आणि सक्षम प्रशासन उभारण्याच्या प्रक्रियेला निश्चितच अधिक गती देणारे ठरणार आहे.
14/05/2026
यशदातील सर्व अधिकारी–कर्मचारी यांच्या क्षमतावृद्धीकरिता मा. महासंचालक डॉ. सुहास दिवसे (भाप्रसे) यांच्या संकल्पनेतून आज, दि. १४ मे, २०२६ रोजी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)’ या विषयावर प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी यशदातील डिजीटल लर्निंग लॅबच्या प्रमुख कल्याणी गोखले यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी महासंचालक डॉ. दिवसे, उपमहासंचालक तथा निबंधक सचिन कलंत्रे, (भाप्रसे), प्राध्यापक पौर्णिमा गायकवाड, (भापोसे) वित्तीय सल्लागार मृदूला इनामदार, यशदातील सर्व अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या सत्रामध्ये AI इकोसिस्टीम, Prompt Engineering, Responsible and Ethical Use of AI या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच Facilitation Techniques चे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यशदातील AI वापराबाबत धोरण निर्मितीबाबत या सत्रात चर्चा झाली. यशदाच्या दैनंदिन कामकाजात AI चा प्रभावी व नैतिक वापर करण्यासाठी या सत्राचा नक्कीच उपयोग होईल अशी आशा उपस्थित प्रशिक्षणार्थींनी व्यक्त केली.
13/05/2026
समाजकार्य आणि पर्यावरण क्लब यशदा आणि ससून रिजनल ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२ मे २०२६ रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीराचे उद्घाटन मा. महासंचालक डॉ. सुहास दिवसे (भाप्रसे) यांच्या हस्ते झाले. यावेळी यशदाचे उपमहासंचालक मा.डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी (भाप्रसे से.नि.)आणि सचिन कलंत्रे (भाप्रसे) उपस्थित होते. यावेळी डॉ. दिवसे यांनीही रक्तदान केले.
यशदामध्ये प्रशिक्षणासाठी असलेले लोकसभा सचिवालयातील अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, विविध विभागातील अतिरिक्त जिल्हाधिकारी, वस्तू व सेवा कर सहआयुक्त तसेच इतर प्रशिक्षणार्थी अधिकारी मिळून एकूण २७ जणांनी उर्त्स्फूतपणे रक्तदान केले. यशदात प्रशिक्षणासाठी आलेल्या सार्वजनिक वैद्यकीय विभागातील प्रशिक्षणार्थी आरोग्य अधिकाऱ्यांचे या रक्तदान शिबीरासाठी योगदान लाभले.