PMC Pune

PMC Pune

Share

Official page of Pune Municipal Corporation (PMC) , a Maharashtra State Government Local Body of Pune City.

Follow us and stay updated with latest news, upcoming events, New projects & initiatives Pune Municipal Corporation(PMC) is an award winning organization that aims to provide superior services to Pune citizens through better governance. Since 1950, the Pune Municipal Corporation(PMC) is administrating the city and serving citizens. Pune Municipal Corporation has undertaken various initiative for i

05/06/2026

कात्रज–कोंढवा रस्ता रुंदीकरण प्रकल्पाला गती!

प्रकल्पात अडथळा ठरणाऱ्या प्रकरणांवर कायदेशीर कारवाई करत रस्ता रुंदीकरणाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका ठोस पावले उचलत आहे.

मा. महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) श्री. ओमप्रकाश दिवटे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कारवाईमध्ये निखिल मार्बल ते एस.बी.आय. चौक, सुंदरबन या परिसरातील बाधित मिळकतींवरील पक्की बांधकामे, अनधिकृत शेड, टपऱ्या, स्टॉल व सीमाभिंती हटविण्यात आल्या.

या कारवाईदरम्यान सुमारे ११,५०० चौ.मी. व्यावसायिक मिळकत व १,४१० चौ.मी. निवासी मिळकत क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आले. तसेच ९ पक्क्या आरसीसी इमारती, १४ पत्र्याची शेड, १२ स्टॉल आणि इतर अडथळ्यांचे निष्कासन करण्यात आले.

शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: https://fxurl.co/PMCCARE

05/06/2026

पुण्याच्या विकासाचा रोडमॅप : महापालिका आयुक्तांशी विशेष संवाद

पुणे शहराचा सर्वांगीण विकास, नागरिक-केंद्रित प्रशासन, पायाभूत सुविधा, पर्यावरण संवर्धन आणि भविष्यातील विकासाच्या विविध योजनांबाबत पुणे महानगरपालिकेचे मा. महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांच्याशी सुप्रसिद्ध अभिनेते व निवेदक संकर्षण कऱ्हाडे यांनी विशेष संवाद साधला.
पुण्याच्या प्रगतीचा वेध घेणारा आणि शहराच्या भविष्यातील वाटचालीवर प्रकाश टाकणारा हा विशेष संवाद नक्की पाहा.

Photos from PMC Pune's post 05/06/2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बालगंधर्व येथे वृक्षारोपण

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पुणे महानगरपालिकेच्या सांस्कृतिक केंद्र व क्रीडा विभागातर्फे बालगंधर्व रंगमंदिर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी प्रसिद्ध सिने अभिनेते मा. श्री. सिद्धार्थ जाधव तसेच पुणे महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी व दुहेरी महाराष्ट्र केसरी मा. श्री. शिवराज राक्षे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमास मा. उपायुक्त (सांस्कृतिक केंद्र व क्रीडा विभाग) डॉ. संतोष टेंगले, मा. महापालिका सहाय्यक आयुक्त (क्रीडा) श्री. गोविंद दांगट, मा. प्रशासन अधिकारी (सांस्कृतिक केंद्र) श्री. राजेश कामठे, मा. प्रशासन अधिकारी (सांस्कृतिक केंद्र) श्री. पांडुरंग लोहकरे तसेच सांस्कृतिक केंद्र विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

"हरित पुणे, समृद्ध पुणे" या संकल्पनेला बळ देत पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचा संदेश यावेळी देण्यात आला.

Majhi Vasundhara Swachh Survekshan Swachh Bharat Mission - Urban

Photos from PMC Pune's post 05/06/2026

हरित पुणे, समृद्ध पुणे

आज दि. ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पुणे शहराच्या विविध भागांमध्ये पुणे महानगरपालिकेचे पदाधिकारी, कर्मचारी, सभासद, लोकप्रतिनिधी, नागरिक, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून 'हरित पुणे, समृद्ध पुणे' हे स्वप्न साकार करण्यासाठी आपले योगदान दिले.

शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: https://fxurl.co/PMCCARE

Majhi Vasundhara Swachh Survekshan Swachh Bharat Mission, India

Photos from PMC Pune's post 05/06/2026

सर्वांना नमस्कार !

पुणे महानगरपालिकेचे इंद्रधनुष्य पर्यावरण शिक्षण व नागरिकत्व केंद्र तसेच राजीव गांधी प्राणीसंग्रहालय व वन्यजीव संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन २०२६ निमित्त "हवामान बदल" या विषयावर ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

उज्ज्वल भविष्यासाठी हवामान बदलाबाबत जनजागृती करणे आणि त्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान देणे अत्यंत आवश्यक आहे.

प्रश्नमंजुषा लिंक: https://forms.gle/hJr66y5QGGJHfwNJ9

शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: https://fxurl.co/PMCCARE

Majhi Vasundhara Swachh Survekshan Swachh Bharat Mission, India

Photos from PMC Pune's post 05/06/2026

कात्रज–कोंढवा रस्ता रुंदीकरणासाठी निर्णायक कारवाई; ११,५०० चौ.मी. व्यावसायिक व १,४१० चौ.मी. निवासी क्षेत्र अतिक्रमणमुक्त

पुणे शहरातील सातारा रस्ता व सोलापूर रस्ता यांना जोडणाऱ्या आणि मोठ्या प्रमाणावर वाहतूक भार सहन करणाऱ्या कात्रज–कोंढवा रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महानगरपालिकेतर्फे राजस सोसायटी परिसरात संयुक्त अतिक्रमण निर्मूलन व रस्ता रुंदीकरण कारवाई करण्यात आली.

मा. महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) श्री. ओमप्रकाश दिवटे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कारवाईमध्ये निखिल मार्बल ते एस.बी.आय. चौक, सुंदरबन या परिसरातील बाधित मिळकतींवरील पक्की बांधकामे, अनधिकृत शेड, टपऱ्या, स्टॉल व सीमाभिंती हटविण्यात आल्या.

या कारवाईदरम्यान सुमारे ११,५०० चौ.मी. व्यावसायिक मिळकत व १,४१० चौ.मी. निवासी मिळकत क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आले. तसेच ९ पक्क्या आरसीसी इमारती, १४ पत्र्याची शेड, १२ स्टॉल आणि इतर अडथळ्यांचे निष्कासन करण्यात आले.

कात्रज–कोंढवा रस्ता विकास प्रकल्पांतर्गत प्रस्तावित ५० मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी भू-संपादन प्रक्रिया सुरू असून मुख्य रस्ता, सर्व्हिस रस्ते, यू-ड्रेन तसेच माऊलीनगर येथील ग्रेड सेपरेटर यांचा समावेश आहे. रस्ता विकासाची कामे वेगाने पूर्ण करून नागरिकांना अधिक सुरक्षित, सुलभ व गतिमान वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.

यावेळी मा. मुख्य अभियंता (पथ) श्री. राजेश बनकर, मा. उप आयुक्त तथा प्रभारी अतिक्रमण विभाग श्री. रमेश शेलार, मा. अधीक्षक अभियंता (पथ) श्री. अजय वायसे, मा. कार्यकारी अभियंता (पथ) श्री. अनिल सोनवणे, ma. उप अभियंता, भूसंपादन व व्यवस्थापन विभाग श्री. दिगंबर बांगर, मा. भूसंपादन अधिकारी श्री. अंकुश लिंबगे, मा. उप अभियंता (पथ) श्री. संदीप धोत्रे, मा. कनिष्ठ अभियंता, भूसंपादन व व्यवस्थापन विभाग श्री. सचिन गावडे, मा. कनिष्ठ अभियंता, बांधकाम विभाग श्री. योगेश नागणे तसेच मा. कनिष्ठ अभियंता (पथ) श्रीमती वैशाली गिरगे उपस्थित होत्या.

05/06/2026

🌱 जागतिक पर्यावरण दिन विशेष शब्दकोडे 🌱

आजच सहभागी व्हा आणि जिंका खास बक्षिसे!
सहभाग कसा घ्यायचा?
• सर्वप्रथम पीएमसी केअर ॲप डाऊनलोड करा
• ॲपमधील स्पर्धा विभागात जा
• ‘जागतिक पर्यावरण दिन’ या टॅबवर क्लिक करा
• शब्दकोडे सोडवा आणि पाठवा

सहभागी होण्यासाठी आजच पीएमसी केअर ॲप डाउनलोड करा!
https://fxurl.co/PMCCARE

Majhi Vasundhara Swachh Survekshan Swachh Bharat Mission, India

Photos from PMC Pune's post 05/06/2026

Day 3 Highlights | ECD Implementation Science Workshop, Shillong

The final day of the ECD Implementation Science Workshop - From Science to State Action: Building Integrated Systems for Early Childhood Development focused on translating learning into action through collaborative governance, adaptive leadership, and state-level planning.

Participants engaged in technical sessions on collaborative governance and the influence of environments on early childhood development, followed by hands-on group exercises and workshops. A key activity was the application of the Public Life Data Framework, enabling participants to explore how evidence and observations from public spaces can inform planning and decision-making for young children and caregivers.

Representing Pune Municipal Corporation, Mr. Dinkar Gojare (Chief Engineer, Projects), Mr. Amol Rudrake (Deputy Engineer, Garden Department), and Dr. Milind Khedkar (Medical Officer, Health Department) actively participated in action-planning discussions and collaborative exercises, reflecting on key learnings and identifying priorities for strengthening integrated ECD systems.

The workshop concluded with reflections, next steps, and a collective commitment to advancing Early Childhood Development through cross-sector collaboration and evidence-based implementation. Certificates were awarded to participants, marking the successful completion of the three-day learning exchange and convening.

Photos from PMC Pune's post 05/06/2026

🌱 "हरित पुणे, समृद्ध पुणे" २०२६ 🌱

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत वनमहोत्सव, वृक्षारोपण, अल्प दरात रोपेवाटप तसेच बीज संकलन केंद्र उपक्रमांचे उद्घाटन छत्रपती संभाजीराजे उद्यान येथे संपन्न झाले.

याप्रसंगी मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) श्री. ओमप्रकाश दिवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले तसेच नागरिकांना रोपांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास मा. महापालिका सभासद, मा. सह महापालिका आयुक्त तथा सदस्य सचिव, वृक्ष प्राधिकरण डॉ. अशोक दि. घोरपडे, मा. मुख्य अभियंता (पथ) श्री. राजेश बनकर, मा. मुख्य समन्वयक विश्वस्त, नवचैतन्य हास्ययोग परिवार श्री. मकरंद टिल्लू, मा. ॲड. श्री. राजेंद्र आगरवाल, मा. उद्यान अधीक्षक श्री. संतोषकुमार कांबळे, मा. उद्यान अधीक्षक श्रीमती प्रिती प्रसाद, मा. उद्यान अधीक्षक श्रीमती स्नेहल हरपळे, मा. सहाय्यक उद्यान अधीक्षक श्री. रत्नाकर करडे, तसेच नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे सदस्य, विविध मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुणे महानगरपालिकेच्या "हरित पुणे, समृद्ध पुणे" मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण, संवर्धन आणि बीजदानाच्या माध्यमातून अधिक हरित, पर्यावरणपूरक आणि शाश्वत पुणे घडविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: https://fxurl.co/PMCCARE

Majhi Vasundhara Swachh Survekshan Swachh Bharat Mission, India

05/06/2026

पुणे महानगरपालिकेतर्फे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दिनांक ५ जून २०२६ पासून शहरव्यापी "हरित पुणे, समृद्ध पुणे" वृक्ष लागवड अभियानास प्रारंभ करण्यात येत आहे. या अभियानात सर्व नागरिक, संस्था व संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या मा. महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे यांनी केले आहे.

या उपक्रमाद्वारे शहरातील हरित क्षेत्र वाढविणे, स्थानिक वृक्षप्रजातींचे संवर्धन करणे आणि पर्यावरणपूरक नागरी विकासाला चालना देणे हे उद्दिष्ट आहे.


Majhi Vasundhara Swachh Survekshan Swachh Bharat Mission, India Manjusha Deepak Nagpure

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


PMC Main Building, Near Mangla Theatre, Shivajinagar
Pune
411005

Opening Hours

Monday 9:45am - 6:15pm
Tuesday 9:45am - 6:15pm
Wednesday 9:45am - 6:15pm
Thursday 9:45am - 6:15pm
Friday 9:45am - 6:15pm