Kavita Bhongale Patil

Kavita Bhongale Patil

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kavita Bhongale Patil, 227/1, राधानगरी हौसिंग सोसायटी, रो-हाऊस स्कीम, विरंगुळा केंद्राजवळ, दिघी रोड, भोसरी, पुणे/39, Pune.

नगरसेविका - पिंपरी चिंचवड महानगरपालिका.
चिटणीस : भाजपा पिंपरी चिंचवड शहर
प्रमुख विश्वस्त : स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ
संचालिका व सल्लागार : गायत्री ग्रुप ऑफ एज

Photos from Kavita Bhongale Patil's post 05/06/2026

मोदी सरकारची १२ वर्षे | विश्वास, विकास आणि जनकल्याण..! 🌱🇮🇳

माननीय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारची ऐतिहासिक १२ वर्षे पूर्ण होत आहेत. "मोदी सरकारची १२ वर्षे – विश्वास, विकास, जनकल्याण" या अभियानांतर्गत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भोसरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय हिंदुत्ववादी दमदार आमदार पै. महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडलनिहाय वृक्षारोपण उपक्रम उत्साहात संपन्न झाला.

पर्यावरण संरक्षण, जनकल्याण आणि विकसित भारताच्या संकल्पनेसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. 🌳

Narendra Modi Nitin Nabin Amit Shah Devendra Fadnavis Ravindra Chavan Mahesh Landge Shatrughna Kate BJP Maharashtra BJP Pimpri Chinchwad BJP Bhosari

Photos from Kavita Bhongale Patil's post 05/06/2026

"स्थानिक उद्योजकतेला नवी दिशा, व्यापारविश्वाला नवी उंची!"

भोसरी येथील रोशन गार्डन परिसरात मुक्ताई टेक्सटाईल पैठणी साडी सेंटर व कपड्यांचे भव्य शोरूम याचे उत्साहपूर्ण वातावरणात भव्यदिव्य उद्घाटन संपन्न झाले. पारंपरिक पैठणीच्या वैभवाला आधुनिक फॅशनची जोड देत ग्राहकांना दर्जेदार वस्त्रसंपदा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा स्तुत्य प्रयत्न या माध्यमातून साकार झाला आहे.

स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती, व्यापारवृद्धी आणि ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्याच्या दृष्टीने हे शोरूम महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. उद्योजकांच्या जिद्द, परिश्रम आणि दूरदृष्टीचे हे यशस्वी प्रतीक असून, भोसरीच्या व्यापारी विकासाला नवी गती देणारा हा उपक्रम निश्चितच ठरेल.

मुक्ताई टेक्सटाईल परिवाराला या नव्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! भविष्यातही व्यवसाय उत्तरोत्तर प्रगती करत राहो आणि ग्राहकांचा विश्वास अधिकाधिक दृढ होत राहो, हीच सदिच्छा.

05/06/2026

राष्ट्रभक्ती, संघटनशक्ती आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाची प्रेरणा देणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक पूजनीय श्री. माधव सदाशिव गोळवलकर (गुरुजी) यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..!

#माधवसदाशिवगोळवलकर

05/06/2026

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते प्रकर हिंदुत्ववादी राष्ट्रभक्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मा. श्री. योगी आदित्यनाथ जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

MYogiAdityanath

05/06/2026

“निसर्ग वाचवा... भविष्य घडवा!”

आजचा दिवस केवळ पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यापुरता मर्यादित नसून, पृथ्वीच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे.
झाडे लावा, पाणी वाचवा, प्लास्टिकचा वापर टाळा आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी हिरवेगार भविष्य निर्माण करा.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सर्वांना हरित शुभेच्छा! 💚

04/06/2026

🌿 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचा संकल्प! 🌿

"हिरवाई हीच समृद्धी, वृक्षसंवर्धन हीच खरी देशसेवा!"

निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी, भावी पिढ्यांसाठी स्वच्छ आणि निरोगी पर्यावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

🌱 चला, एकत्र येऊया आणि पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करूया!

📅 शुक्रवार, दि. 05 जून 2026
⏰ सकाळी 10:00 वाजता
📍 स्थळ : संत सेवालाल महाराज मंदिर, फुगे वस्ती, आळंदी रोड, दिघी-15

🌳 "एक वृक्ष लावा, पर्यावरण वाचवा;
हिरवीगार धरती, सुंदर भविष्य घडवा!"

वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि पर्यावरणावरील संकटांचा सामना करण्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपणात सक्रिय सहभाग घेणे ही काळाची गरज आहे. आपल्या एका वृक्षामुळे भविष्यातील अनेक पिढ्यांना शुद्ध हवा, स्वच्छ वातावरण आणि हरित जीवनाचा लाभ मिळणार आहे.

आपली उपस्थिती आणि सहभाग हा पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला नवी ऊर्जा देणारा ठरेल.

चला, पर्यावरण रक्षणासाठी हातात हात घालून हिरवाईचा संकल्प पूर्ण करूया!

🌿 आपले सहर्ष स्वागत आहे..! 🌿

04/06/2026

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका व माझी सहकारी सौ. नम्रताताई लोंढे व श्री. योगेशभाऊ लोंढे आपणांस लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आपल्या दोघांच्या सहजीवनाचा हा सुंदर प्रवास प्रेम, विश्वास, समजूतदारपणा आणि परस्पर आदर यांच्या आधारावर अधिकाधिक बहरत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!



04/06/2026

धुळे येथून सुरतकडे जाणारी आणि सुरतहून महाराष्ट्राकडे येणाऱ्या दोन एसटी बसची सुरतजवळ महामागविर समोरासमोर झालेली भीषण धडक अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी आहे. या दुर्दैवी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्व प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखद प्रसंगातून सावरण्याचे बळ मिळो. तसेच, अपघातात जखमी झालेले सर्व प्रवासी लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावेत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!

भावपूर्ण श्रद्धांजली..!

Photos from Kavita Bhongale Patil's post 04/06/2026

📍 “मोदी सरकारची १२ वर्षे – विश्वास, विकास व जनकल्याणाची”

पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या संघटनात्मक संपर्क दौऱ्याअंतर्गत पिंपरी-चिंचवड व पुणे उत्तर (मावळ) जिल्ह्याची विभागीय आढावा बैठक उत्साहात पार पडली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या १२ वर्षांच्या विकास, विश्वास आणि जनकल्याणाच्या कार्याचा आढावा यावेळी घेण्यात आला. विविध मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली संघटनात्मक बळकटीकरण, आगामी कार्यक्रमांची रूपरेषा आणि जनसंपर्क अभियानाबाबत चर्चा झाली.

मोदी सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

Narendra Modi Nitin Nabin Amit Shah Devendra Fadnavis Ravindra Chavan Mahesh Landge Shatrughna Kate BJP Maharashtra BJP Pimpri Chinchwad BJP Bhosari

#मोदीसरकार12वर्षे

04/06/2026

मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदाचा बादशाह, अभिनयाचा अष्टपैलू कलाकार आणि लाखो रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (अशोक मामा) यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

#मराठीचित्रपटसृष्टी #अशोकसराफ

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


227/1, राधानगरी हौसिंग सोसायटी, रो-हाऊस स्कीम, विरंगुळा केंद्राजवळ, दिघी रोड, भोसरी, पुणे/39
Pune
411039